महाअपडेट टीम : तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेतील सफाई कामगारानेच बलात्कार केल्याची भयानक घटना वाराणसीत घडली आहे. या प्रकरणी आरोपी सफाई कामगाराला सिगरा पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, शिवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसाहतीत राहणारी विद्यार्थिनी इयत्ता तिसरीत शिकते. दुपारी मुलगी घरी पोहोचली तेव्हा ती खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसली होती. यावरून तिच्या आईने तिचा गणवेश पाहिला तर तो रक्ताने माखलेला दिसल्याने आईने तपासणी केली असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

आईने मुलीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली, त्यानंतर लगेच डायल-112 वर माहिती देण्यात आली. सिगरा पोलिसांसह मुलगी आणि कुटुंबीयांनी शाळा गाठली. शाळा व्यवस्थापनाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या आवारात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि पाच मिनिटांच्या फुटेजमध्ये विद्यार्थिनी आणि सफाई कामगार एकटेच आढळल्याचे दिसून आले.

फॉरेन्सिक टीमने शाळेच्या आवारात घटनास्थळाचा शोध घेत काही पुरावे हाती घेतले. यानंतर सफाई कर्मचारी अजय कुमार याला पोलिसांनी कॅन्टमधील मानसनगर पसियाना परिसरातून अटक केली आहे.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पॉक्सो कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *