महाअपडेट टीम : विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने 20 सदस्यीय संघाची निवड केली असून शम्स मुलाणी याच्याकडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. यशस्वी जयस्वालसह अनेक दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

शम्स मुलाणीने या आधीही संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेपूर्वी मुंबईने ओमानचा दौरा केला होता. त्यावेळी वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत शम्स मुलाणीकडं संघाच कर्णधारपद देण्यात आलं होतं.

श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ हे खेळाडू विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy) उपलब्ध नसणार आहे. भारतीय संघात त्यांचा समावेश असल्याने त्यांना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

त्यामुळेच सलील अंकोला यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अरमान जाफर आणि यशस्वी जयस्वाल यांसारख्या दिग्गज खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सिद्धेश लाडचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, सर्फराज खानला संघात स्थान देण्यात आलं नाहीये. तो भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.

अनुभवी अष्टपैलू शिवम दुबेचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मधल्या फळीत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीत धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ :- 

शम्स मुलाणी (कर्णधार), सिद्धेश लाड, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, अमन खान, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, हार्दिक तामोर, प्रसाद पवार, मोहित अवस्थी, सागर मिश्रा, आतिफ अत्तरवाला, दीपक शेट्टी, तनुष कोटियन, प्रशांत सोळंकी, साईराज पाटील, परीक्षित वळसंगकर आणि आकर्षित गोमेल.

Leave a comment

Your email address will not be published.