महाअपडेट टीम : भारतातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाचा डाव हा 345 धावांवर आटोपला. न्यूझीलंडचा स्विंग गोलंदाज टीम साऊदीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
कानपूरच्या या ग्रीन पार्क स्टेडियमवर तब्बल 41 वर्षांनंतर परदेशी वेगवान गोलंदाजाने पाच विकेट घेतल्या आहेत. साऊदीने आत्तापर्यंत तब्बल तेराव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहे.
कानपूरमध्ये 1980 पासून एकाही विदेशी वेगवान गोलंदाजाने एका डावात 5 घेतलेल्या नाहीत. यापूर्वी 1979 मध्ये पाकिस्तानच्या सिकंदर बख्त आणि एहतेसामुद्दीन यांनी ही कामगिरी केली होती.
आज सकाळपासून भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 4 बाद 258 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिवसाच्या तिसऱ्या षटकात साऊदीने रवींद्र जडेजाला क्लीन बोल्ड करत संघाला पाहिलं यश मिळवून दिलं. जडेजा धावसंख्येत एकही धाव न जोडता आउट झाला. यानंतर साउदीने लगेचच यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहालाही एकाच धावेवर कट आउट केले.
साहानंतर श्रेयस अय्यरने आपल्या कसोटी पदार्पण त्याने 171 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 105 धावा केल्या. त्यानंतर साउदीने अय्यरलाही बाद केलं. यानंतर साउदीने अक्षर पटेलला बाद करत ग्रीन पार्कवर पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. टीम साऊदीशिवाय काईल जेमसनने तीन विकेट घेतल्या आहेत. फिरकीपटू एजाज पटेलला दोन विकेट मिळाल्या.