महाअपडेट टीम : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) रिटेन्शन डेडलाइन जवळ आली असून काही दिवसांत होणाऱ्या मेगा लालावापूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल याबाबत चाचपणी सुरु आहे. ICC ने प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त 4 खेळाडू संघात ठेवण्याची परवानगी दिली आहे.

या दरम्यान राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने संजू सॅमसनला पहिला खेळाडू म्हणून रिटेन केलं आहे. संघातील उर्वरित जागांसाठी कोणते खेळाडू रिटेन करणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सर्व फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे.

राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला केलं रिटेन :-

राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने त्याला तब्बल 14 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवलं आहे. तसं पाहिलं तर फ्रँचायझी सॅमसनला प्रत्येक सिझनची 16 कोटी रुपये देते परंतु यावेळी तो 14 कोटींमध्येच तयार झाला आहे. राजस्थान रॉयल्सने रिटेन ठेवलेला संजू सॅमसन हा पहिला खेळाडू आहे.

संजूची आयपीएल 2021 मध्ये दमदार कामगिरी :-

संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्सने 2018 साली 8 कोटी रुपयांमध्ये संघात घेतलं होतं . आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. मात्र, कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी ठरला नाही आणि आपल्या संघाला अंतिम चारमध्येही नेऊ शकला नव्हता. पण एक फलंदाज म्हणून त्याचा मागचा सिझन खूपच यशस्वी ठरला होता. आयपीएल 2021 मध्ये त्याने 137 च्या स्ट्राइक रेटने 484 धावा केल्या होत्या.

आणखी या खेळाडूंच्या नावावरही चर्चा सुरू :-

संजू सॅमसनला रिटेन केल्यामुळे संघात तीन जागा शिल्लक आहेत…. त्यासाठी खेळाडूंना कायम ठेवायचं आहे. फ्रँचायझी लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांची नावेही चर्चेत आहे. परंतु आता यापैकी कोणत्या खेळाडू फ्रँचायझीच्या पसंतीत उतरतोय हे काही दिवसात समजेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *