महाअपडेट टीम : अँशेस सिरीज पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. संघाचा नवा कर्णधार म्हणून जगातील नंबर 1 वेगवान कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सची नियुक्ती करण्यात आली आहे. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा 47 वा कर्णधार ठरला आहे.
त्याचबरोबर संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. कमिन्स आता टीम पेनची जागा घेणार आहे, टीम पेनने गेल्या आठवड्यात आपल्या सहकारी महिला जोडीदाराला अश्लील संदेश पाठवल्यानंतर टीकेची झोड उठली होती अखेर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
कमिन्सने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 34 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2.75 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 164 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाकडून 69 एकदिवसीय आणि 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. कमिन्सने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 111 आणि टी-20मध्ये 42 विकेट्स घेतल्या आहेत.
या आधी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज म्हणून कर्णधारपदाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज रे लिंडवॉल यांनी केलं हॉतं. 1956 मध्ये त्यांनी कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा 47 वा कसोटी कर्णधार आहे.
कर्णधार पदी निवड झाल्यानंतर पॅट कमिन्सने निवेदनात म्हटलं आहे की, ”अँशेसपूर्वी ही जबाबदारी स्वीकारताना मला अभिमान वाटतोय, मला अशा आहे की मी टीम पेनचं काम यापुढेही चालू ठेवू शकेन.”
अँशेसचा ऑस्ट्रेलिया VS इंग्लंडचा पहिला टेस्ट सामना हा 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे.