महाअपडेट टीम : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे दक्षिण आफ्रिकेत खळबळ उडाली आहे.
जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या आंतराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्याबाबत विचारात आहे. आता या दौऱ्यावर कोरोनाचं सावट पहायला मिळत आहे. टीम इंडियाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे .
या दौऱ्यात टीम इंडियाला 3 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. परंतु या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा एम नवीन व्हेरियंट समोर आला असून धुमाकूळ घातला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. सध्या नेदरलँडचा संघही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मालिकेतील दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना नियोजित वेळेनुसार होईल की नाही हे ठरवण्यासाठी नेदरलँड क्रिकेट संघ व्यवस्थापकाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट कॉन्सिल अधिकाऱ्यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे.
या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरियंट आढळला आहे. यामुळे सगळे देश चिंतेत पडले आहे. आता युके (UK) नेही दक्षिण आफ्रिकेत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना रेड लिस्ट मध्ये टाकलं आहे. तसेच इतर देश सुद्धा विमान प्रवास बंद करणार आहे.
या नव्या व्हेरियंट रूप अधिक घातक असून नवीन व्हेरियंट एका व्यक्तीपासून दुस-यामध्ये अधिक सहजपणे संक्रमण हॉट आहे, परंतु तो डेल्टापेक्षा अधिक प्रभावी आहे की नाही हे अद्याप समजलं नाही. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांना जागतिक आरोग्य संघटनेकडून अजून याबाबत माहिती मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेत गेल्या आठवड्यापासून संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
कोरोनाची चौथी लाट येत्या काही आठवड्यांत शिखरावर पोहचण्याची शक्यता असून आता यामुळे भारतालाही धोका बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित होण्याची दाट शक्यता आहे.