महाअपडेट टीम : कोरोनाचा प्रभाव सध्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने पासून लोकांनी कसाबसा बचाव केला होता. परंतु पुन्हा एकदा कोरोनाने सर्वसामान्यांच्या जीवनातलं आनंदाचं वातावरण हिरावून घेतलं आहे.

यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा नवीन व्हेरियंट प्राणघातक स्वरूपात परतला आहे, ज्याला शास्त्रज्ञ यांनी ओमिक्रॉन व्हेरियंट असं नाव दिलं आहे. ओमिक्रॉनची सुरुवात प्रथम दक्षिण आफ्रिकेत झाली. पण आता त्याची 25 हून अधिक रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळ सारख्या भारतातील अनेक राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे अधिक रुग्ण आढळून येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकेत, ओमिक्रॉन व्हेरियंटही सर्वात जास्त लक्षणे लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये दिसून आली आहे. ओमिक्रॉनमध्ये सौम्य ते गंभीर लक्षणे असल्याचे नोंदवले गेले आहे, ज्यामुळे मुलांना अनेक दिवस रुग्णालयात दाखल करावं लागतं आहे . आज आम्‍ही तुम्‍हाला लहान मुलांमध्‍ये आणि प्रौढांमध्‍ये Omicron व्हेरियंटची लक्षणे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

लहान मुलांमध्ये ही आहेत Omicron व्हेरियंटची लक्षणे :-

दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये मुलांची संख्या जास्त आहे. सामान्य ते गंभीर अशा अनेक मुलांमध्ये Omicronची विविध प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘रुग्णालयात येणाऱ्या मुलांमध्ये कोरोनाच्या सौम्य लक्षणांपासून ते गंभीर लक्षणेही दिसून येत आहेत, त्यामुळे ते अधिक आजारी पडत आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, सपोर्टिव्ह थेरपी दिली जात आहे.

यासोबतच ओमिक्रॉनची अनेक लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत. दीर्घ ताप, दीर्घकाळ खोकला, थकवा, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि भूक न लागणे यासारख्या समस्या दिसू शकतात. त्यामुळे 5 वर्षांपर्यंत लहान मुलांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

वृद्ध आणि तरुणांमध्ये ही आहेत Omicron व्हेरियंटची लक्षणे :-

मुलांबरोबरच, Omicron चा हा व्हेरियंट अनेक तरुण आणि प्रौढांमध्येही अनेक लक्षणे दाखवत आहे. त्यांना खूप ताप, थकवा आणि घसा खवखवणे यासारख्या समस्याही होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लसीच्या अभावामुळे Omicron ची ही लक्षणे लहान मुलांमध्ये आणि काही तरुणांमध्ये दिसून येत आहेत.

या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष :-

कोरोना व्हायरस आणि त्याचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनची अनेक लक्षणे आहेत, त्यांना तुम्ही हल्ल्यात घेऊ नका. लक्षणांमध्ये घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, स्नायू दुखणे आणि अत्यंत थकवा यांचा समावेश होतो. त्यामुळे ही लक्षणे दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *