महाअपडेट टीम : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन आणि आतापर्यंतच्या सर्वात खतरनाक व्हेरियंटने जगभरासह भारतीयांची चिंता वाढवली आहे.
नवा व्हेरियंट पाहता महाराष्ट्र राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.नव्या गाईडलाईन्स, कोणत्याही देशातून राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना यासंदर्भात केंद्राच्या सूचनांचे पालन करावं लागणार आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना एकतर कोरोना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवावं लागेल किंवा 72 तासांपूर्वीचा RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.
तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, लोकांना कोरोनाच्या व्हेरियंट बद्दल चिंता आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांना प्रथमतः क्वारंटाईन करण्यात येणार असून पूर्ण तपासणी केली जाईल. तसेच जीनोम सिक्वेन्सिंग करून घेतलं जाईल.
ख्रिसमस नाताळ जवळ आल्याने जगभरातून अनेक लोक आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र आणि मुंबईत येणार असल्यानं BMC सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. हा व्हेरियंट बर्याच देशांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे आणि म्हणून आपण तयार असणे आवश्यक आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना नियमित मास्क घालण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केलं आहे यापूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं होतं की, दक्षिण आफ्रिकेतून शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट केली जाईल आणि ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.