महाअपडेट टीम : देशभरातून कोरोना व्हायरसचा कहर हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. तसेच अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी घट होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 8,318 नवे रुग्ण आढळले आहे. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय सातत्याने नवे पाऊलं उचलत असून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमही राबावत आहे.
कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. आज पंतप्रधान मोदी देशातील कोरोना व्हायरस आजाराच्या परिस्थितीबाबत उच्च अधिकाऱ्यांची बैठक सुरु झाली असून सध्या सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा ते आढावा घेत आहे.
देशभरातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, दररोज जितक्या लोकांची कोरोनाची लागण होत आहे, त्यापेक्षा जास्त लोक कोरोनापासून बरेही होत आहेत. गेल्या 24 तासांत 10,967 लोक कोरोनातुन मुक्त झाले असून, त्यानंतर देशातील कोरोनातुन बरे झालेल्यांची संख्या 3,39,88,797 वर पोहोचली आहे. याशिवाय, देशात कोरोनाच्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,07,019 वर पोहचली आहे.
आता पीएम मोदीही कोरोनासंदर्भात बैठक घेत असून यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’बद्दल चिंता व्यक्त केली आहे. या महिन्यात होणारी पीएम मोदींची ही दुसरी बैठक आहे. यापूर्वी 3 नोव्हेंबर रोजी त्यांनी लसीकरणाची व्याप्ती कमी असलेल्या जिल्ह्यांचे अधिकारी आणि संबंधित मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
आजपर्यंत सरकारने देशभरात 121.06 कोटी कोरोना लस देण्यात आली आहेत. याशिवाय देशभरात कोरोना चाचणीही केली जात असून, त्याअंतर्गत 63.82 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या पंतप्रधान मोदी त्यांच्या बैठकीत लसीकरणाचा आढावा घेत असून अधिकाऱ्यांसोबत इतर मुद्द्यांवर चर्चा करत आहे.