महाअपडेट टीम : कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन नावाचा हा व्हेरियंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. जागतिक आरोग्य संघटनेनेही या नवीन व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. पुन्हा एकदा या नव्या व्हेरियंट जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेत 9 नोव्हेंबर रोजी गोळा केलेल्या नमुन्यातून संशोधकांना 24 नोव्हेंबर रोजी ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. अनेक देश ओमिक्रॉन चा प्रसार रोखण्यासाठी झटत असून याचा इफेक्ट मुळे शेअर मार्केट आणि तेलाच्या किमतीही घसरल्या असतानाही त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील उड्डाणांवर बंदी घातली आहे, त्यामुळे संभाव्य जागतिक आर्थिक वाढीला काही प्रमाणात अपंगत्व आलं आहे.
यूएन हेल्थ एजन्सीने (UN Health Agency) सांगण्यात आलं आहे की, ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट व्हायरसवर स्टडी पूर्ण होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात, ज्यामध्ये कोविड लसीकरण आणि टेस्टवर काही परिणाम होतो की नाही हे पाहिले जाईल. दक्षिण आफ्रिकेनंतर, हा स्ट्रेन बोत्सवानासह इतर अनेक देशांमध्ये पसरला असून पूर्ण जगाला धोक्याची घंटा आहे.
हा व्हेरियंट लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो हे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केलं आहे. या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त करताना, हा वेगाने पसरणारा व्हेरियंट असल्याचं म्हटलं आहे. अन् हे तर खूपच धोकादायक आहे कारण लसीकरण झालेल्या व्यक्तीमध्येही हा विषाणू आढळून आला आहे.
काय आहे हा नवा व्हेरियंट ?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये (Omicron variant) अनेक स्पाइक प्रोटीन म्यूटेशन आहेत आणि ते अत्यंत संसर्गजन्य आहे. आतापर्यंत कोरोना महामारीचे अनेक व्हेरियंट समोर आले आहेत. शास्त्रज्ञ देखील नव्या व्हेरियंटवर संशोधन करीत आहे. असं मानलं जातंय की हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीला वेगाने हरवण्यात कार्यक्षम आहे आणि हा आतापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हेरियंट असल्याचं बोललं जातं आहे.
काय आहेत लक्षणे ?
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) ने असं म्हटलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंट (Omicron variant) संसर्गासाठी कोणतीही असामान्य लक्षणे आढळली नाहीत. डेल्टा (Delta) सारख्या ओमिक्रॉनने (Omicron) संक्रमित काही लोक लक्षणे नसलेले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळली नव्हती…
WHO च्या मते, सध्याचा SARS-CoV-2 PCR हा व्हेरियंट शोधण्यात सक्षम आहे. या नव्या व्हेरियंटमुळे भारत देखील सतर्क झाला आहे, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार असून आणि त्यांची टेस्ट घेण्यात येणार आहे.