महाअपडेट टीम : जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरतर, अलीकडेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

नवीन नियमानुसार, नोकरी बदलल्यानंतर, पीएफ (PF) खाते आपोआप कर्मचाऱ्याच्या नवीन कंपनीकडे हस्तांतरित केलं जाणार आहे. आतापर्यंत हा नियम नव्हता. आता नोकरी बदलल्यानंतरही ईपीएफ खाते क्रमांक (EPF account number) तोच राहणार आहे. सध्या UAN क्रमांक तोच राहतो व PF खाते क्रमांक बदलतो.

आता काय होणार आहे बदल :-

जर एखाद्या EPF सदस्याने नोकरी बदलली, तर नवीन कंपनीमध्ये नवीन PF खातं उघडलं जातं. अशा परिस्थितीत, कर्मचार्‍याने पूर्वीच्या कंपनीकडे ठेवलेल्या ईपीएफ (PF) खात्यात जमा केलेले पैसे नव्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. ही प्रोसेस सदस्य सेवा पोर्टलद्वारे पूर्ण केली जाते. मात्र, यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार लिंक (Aadhaar link) करणं आवश्यक आहे. तसे नसल्यास, नवीन कंपनीला एक फॉर्म सबमिट करावा लागेल आणि तो ट्रान्सफर करावा लागणार आहे.

EPF ट्रान्सफर करण्याची काय आहे गरज :

मुळात, PF ची रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असली तरीही, पाच वर्षे सतत सेवा असेल तरच टॅक्समधून सूट मिळते. जर अकाउंट ट्रान्सफर केलं नाही तर, आधीच्या कंपनीसोबत घालवलेला कालावधी सेवेच्या कालावधीत गणला जात नाही. जर तुमच्याकडे सलग पाच वर्षे सेवा नसेल, तर तुमच्या पूर्वीच्या EPF अकाउंट मधील तील व्याजासह मिळालेली रक्कम काही अटींच्या अधीन राहून टॅक्स पात्र होईल.

मात्र, नव्या नियमाच्या अंमलबजावणीमुळे वेळोवेळी नोकरी बदलणाऱ्या लोकांना फायदा होईल. यासाठी, EPFO ने C-DAC द्वारे केंद्रीकृत IT- इनेबल्ड सिस्टम विकसित करण्यास मान्यता दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *