महाअपडेट टीम :- लाइफ सायन्सेस कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्सने (Tarsons Products) शेअर मार्केटमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. आज लिस्टिंग केल्यामुळे कंपनीने ज्या गुंतवणूकदारांना IPO चे वाटप केले आहे ते सर्व श्रीमंत झाले आहे.
इतकंच नाही तर लिस्टिंग झाल्यानंतर काही वेळातच कंपनीच्या शेअरमध्येही अप्पर सर्किट झालं. जेव्हा कंपनीचा स्टॉक मर्यादेपेक्षा जास्त खरेदी केला जातो तेव्हा अशा परिस्थितीत अप्पर सर्किट होतं.
Tarsons Products च्या शेयर्सची प्राईस किती : –
शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध झाल्यानंतर टार्सन्स प्रॉडक्ट्सच्या शेअरची किंमत 20 % वाढून 840 रुपयांच्या लेव्हलवर पोहोचली. इश्यू किमतीच्या तुलनेत ही सुमारे 26.89 % वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटल 4,469.33 कोटी रुपये आहे. टार्सन्स प्रॉडक्ट्च्या आयपीओ (Tarsons Products IPO) च्या प्राइस बँडबद्दल बोलायचं झालं तर ते प्रति शेअर 635-662 रुपये होते.
एका लॉटमध्ये किती शेअर्स :
एकाच वेळी लॉटमध्ये 22 शेअर्स ठेवले होते. याचा अर्थ असा की, गुंतवणूकदाराला एक लॉट जरी दिला तरी त्याला प्रति शेअर 178 रुपये नफा झाला आहे. ज्या गुंतवणूकदारांना एक लॉट वाटप करण्यात आला आहे त्यांना सुमारे 4,000 रुपयांचा नफा झाला आहे. टार्सन्स प्रॉडक्ट्सने IPO द्वारे 1024 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवलं होतं. कंपनीचा IPO 77.49 पट सबस्क्राइब झाला.