महाअपडेट टीम : भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं खूपचं फायदेशीर आणि किफायतशीर आहे. म्हणूनच देशातील सर्वसामान्यांचा त्यांच्या प्रत्येक योजनेवर विश्वास आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.

अशी योजनाआवर्ती ठेव योजना म्हणंजेच (RD) बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही मासिक आधारावर 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युरिटीनंतर 5 वर्षांसाठी ते आणखी वाढवू शकता. जर तुम्ही आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक केली तर 120 महिन्यांच्या आत तुम्हाला 24 लाख रुपये मिळू शकतात.

असं खोलू शकता RD अकाउंट :-

पोस्ट ऑफिसमध्ये स्मॉल सेव्हिंगसाठी किमान 100 रुपयांच्या ठेवीवर RD खातं उघडलं जाऊ शकतं.

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, तुम्ही या खात्यात 10-10 रुपयांच्या पटीत आणखी रक्कम जमा करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसमध्ये, सध्या RD वर वार्षिक 5.8 % व्याजदर आहे. ज्यामध्ये व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. जर तुम्ही दरमहा 15 हजार रुपये जमा केले आणि 5 वर्षांनी हे खाते 5 वर्षांसाठी वाढवलं तर तुम्हाला 120 महिन्यांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर 24 लाख 39 हजार 714 रुपये मिळतील.

हा सुद्धा मिळतोय फायदा :-

पोस्ट ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती कितीही RD अकाउंट्स उघडू शकते. यामध्ये, जास्तीत जास्त 3 लोकांसह संयुक्त RD खातं देखील उघडता येतं. त्याच वेळी, अल्पवयीन मुला – मुलीसाठीही पालक खाते उघडू शकता. तसेच, RD खात्यावर 12 हप्ते जमा केल्यानंतर, खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करता येते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *