महाअपडेट टीम : इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Fisker ने लॉस एंजेलिस ऑटो शो 2021 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार, Ocean SUV लॉंच केली आहे. आधुनिक फीचर्सनी सुसज्ज असलेल्या, या एसयूव्हीचे (SUV) फीचर्स म्हणजे त्याचे सोलर पॅनल, ज्यामुळे ही कार चार्ज केल्यावर वार्षिक 2414 किमीची रेंज देण्यास सक्षम ठरू शकते . या Fisker SUV मध्ये आणखी काय आहे खास ते जाणून घेऊया.

फीचर्स :-

सर्वोत्कृष्ट डिझाइनसह सुसज्ज असलेल्या या SUV च्या फीचर्सबद्दल सांगायचं तर, यात प्रचंड अलॉय व्हील आहेत तसेच एलईडी डीआरएलसह सुसज्ज तीक्ष्ण आणि पातळ हेडलाईट याला आक्रमक रूप देते. यामध्ये 17.1-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले व्हर्टीकली सेट केला आहे, जो तुम्ही तुमच्यानुसार हॉरीझॉन्टल मोड मध्ये फिरवू शकता. कंपनीने याला ‘हॉलीवूड मोड’ असं नाव दिलं आहे.

पॉवर / रेंज :-

Fisker Ocean SUV मजबूत लुकसह पॉवर आणि रेंजच्या बाबतीत खूपचं शक्तिशाली आहे. तरुण पिढीला लक्ष्य करून ही कार बनवण्यात आली आहे. Fisker Ocean SUV तीन ट्रिममध्ये लॉन्च केली जाईल, जिथे स्पोर्ट ट्रिममधील मोटर जास्तीत जास्त 275 हॉर्सपॉवरची पॉवर जनरेट करते आणि कारला 250 किमी ची रेंज देते.

अल्ट्रा ट्रिमला (Ultra Trim) 540 हॉर्सपावर मिळेल, जी 340 मैल रेंज देऊ शकते. तसेच (Xtreme) मॉडेल 550 हॉर्सपावर आणि 350 किमी रेंजसह सुसज्ज असण्याची शक्यता आहे. यात छतावर सोलर पॅनल बसवण्यात आलं आहे. कंपनीने दावा केला आहे की, सौर पॅनेल सूर्यप्रकाशाने चार्ज केल्यावर 1500 मैल 2414 किमी वार्षिक ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल.

किंमत :-

Fisker Ocean SUV ची स्पोर्ट ट्रिम सुमारे 27.9 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विकली जाईल.
अल्ट्रा ट्रिम (Ultra Trim) सुमारे 37.20 लाख रुपयांपासून सुरू होईल
Top Trim Extreme सुमारे 51.34 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *