महाराष्ट्रात तापमानामुळे जनता पुरती हैराण झाली आहे. राजधानी मुंबईत (Mumbai Weather Update) तापमानाचा पारा काही अंश खाली आला असला तरीदेखील जनतेला उकाड्यापासून आराम मिळाला नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) सूर्य देवतेचा प्रकोप बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात तापमानाची सर्वाधिक झळ मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील (Vidarbha) जिल्ह्यात अधिक बघायला मिळत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तर तापमान 45 अंश सेल्शिअसवर गेले आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.
राजधानी मुंबईमध्ये कमाल तापमानात घसरण झाल्याचे हवामान विभागाकडून नमूद करण्यात आलं असून मुंबईचे सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मात्र कमाल तापमानात झालेली घसरण देखील मुंबईकरांना उकाकाड्या पासून आराम देण्यात असमर्थ असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
कुठं-कुठं बघायला मिळेल उष्णतेची लाट
IMD (Indian Meteorological Department) ने जारी केलेल्या माहितीनुसार, गत 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहीले आहे. गोव्यामध्ये देखील महाराष्ट्राप्रमाणेच परिस्थिती बघायला मिळाली.
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मागील 24 तासात जास्तीत जास्त तापमानात सरासरीचा विचार करता थोडी वाढ झाल्याचे सांगितले गेले.
बाकी उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी सारखेच नोंदवले गेले. मात्र पुढील पाच दिवस उष्णतेचे राहणार असल्याचे सांगितले जात आहे कारण की, आगामी पाच दिवस विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आज कुठं अधिक असणार सूर्यदेवाचा प्रकोप
आज अर्थात 9 मे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्यदेव कोपणार असल्याचे सांगितले जात आहे. आज या विभागात उष्णतेची लाट येणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यामुळे निश्चितच नागरिकांना काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाने देखील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
10,11 आणि 12 तारखेला काय म्हणतं हवामान?
उद्यापासून ते 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कोकण विभागात पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकीकडे कोकणात पावसाच्या रिमझिम सऱ्या बरसणार असल्याचे सांगितले जातं आहे तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट या कालावधीदरम्यान राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.