Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update :- मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील हवामान (Maharashtra Climate) संमिश्र स्वरूपाचे बनले आहे. एखाद्या ठिकाणी आकाशात हलके ढग दिसत आहेत तर काही ठिकाणी हवामान अतिशय स्वच्छ आणि निरभ्र स्वरूपाचे आहे. याशिवाय महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट कायम राहत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (By the Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अर्थात आज राज्यातील (Maharashtra) बहुतांश भागात हवामान (Weather Update) स्वच्छ राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज निश्चितच महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासा देणारा आहे. मात्र असे असले तरी हवामान विभागाने उत्तर मध्य महाराष्ट्र (North Central Maharashtra) आणि विदर्भात (Vidarbha) काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat wave) येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

आज अर्थात 7 तारखेपासून ते 9 मे दरम्यान विदर्भातील नागपूरसह इतर अनेक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उष्णतेची लाट ओसरल्यानंतर पुन्हा आकाशात ढग जमा होऊन ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया शनिवारी अर्थात आजचे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान.

राजधानी मुंबई : मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईत जास्तीत जास्त तापमान 36 आणि कमीत कमी तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे. याशिवाय मुंबईतील हवामान अतिशय स्वच्छ आणि निर्मळ राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुणे:- पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात जास्तीत जास्त तापमान 40 आणि कमीत कमी तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राजधानी मुंबईप्रमाणेच पुण्यात देखील हवामान स्वच्छ राहणार असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नागपूर- विदर्भातील नागपुरात जास्तीत जास्त तापमान 44 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून सांगितला गेला आहे. मात्र यादरम्यान नागपूर मध्ये आकाशात हलके ढग कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नाशिक- पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जास्तीत जास्त तापमान 38 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 20 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे. यादरम्यान नाशिककरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे हवामान स्वच्छ राहणार आहे.

औरंगाबाद- मराठवाड्यातील प्रमुख शहर म्हणजेच औरंगाबादमध्ये जास्तीत जास्त तापमान 41 अंश सेल्सिअस आणि कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यादरम्यान औरंगाबाद शहरातील आकाश निरभ्र राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.