उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेसाठी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) एक दिलासा देणारी बातमी सार्वजनिक केली आहे.

आज बुधवार 11 मे पासून ते पुढील तीन ते चार दिवस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस कोसळणार (Rainfall Forecast) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामुळे उकाड्यापासून महाराष्ट्रातील जनतेला आराम मिळणार असल्याचे सांगितले जात होते. 13 मे पर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मित्रांनो राज्यात सर्वत्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बघायला मिळत आहे. यामुळे तापमानात थोडी घट झाली असली तरी देखील दमट वातावरणाने राज्यातील जनता घामाघूम झाली आहे.

तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. आता हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट अजून तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे विदर्भ वासियांना काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

कालपर्यंत गोवा राजधानी मुंबई समवेतच कोकणात कोरडे वातावरण बघायला मिळाले. मात्र आता यामध्ये मोठा बदल होणार असून आज गोवा कोकण राजधानी मुंबई मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

याउलट उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे यामुळे विदर्भ वासियांना विशेष काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे.

11 मे राजधानी मुंबईचे हवामान
मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून राजधानी मुंबईत ढगाळ वातावरण बघायला मिळाले. यामुळे मुंबईकरांना दमट वातावरणाचा सामना करावा लागला. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भात काल जास्तीत जास्त तापमानात मोठी वाढ बघायला मिळाली.

आज राजधानी मुंबईत विशेषता नवीन मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे निश्चितच मुंबईकरांना उकाड्यापासून आराम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे असानी चक्रीवादळामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यात सतर्कतेचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

आसानीचा महाराष्ट्रावर काय होईल परिणाम?
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या असानी चक्रीवादळामुळे भारतातील अनेक राज्यात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मात्र याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही असे देखील या वेळी नमूद करण्यात आले आहे.

या चक्रीवादळामुळे बंगालमध्ये मात्र जोरदार वेगाचे वारे वाहणार असून बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालमधील उत्तर बंगाल या भागात या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम बघायला मिळणार आहे.

दरम्यान या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होणार नसला तरी देखील राज्यातील काही भागात सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळत असल्यामुळे जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रात देखील वर्तविण्यात आली आहे.

तीन दिवसाचा हवामान अंदाज
11मे – राजधानी मुंबई कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. याउलट मात्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार.

यामुळे संबंधित भागातील जनतेला सावधानतेचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
12मे- उद्या अर्थात 12 मे कोकण गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून विदर्भातील काही जिल्ह्यांत उद्या देखील उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.

13 मे- 13 तारखेला मात्र कोकणातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कोकणवासीयांना उकाड्या पासून आगामी दोन दिवसात आराम मिळण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Your email address will not be published.