मुंबई, दि. १५ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  बिपीन श्रीमाळी  व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या कराराअंतर्गत कोकण रेल्वेच्या रत्नागिरीस्थित प्रस्तावित कोल्ड स्टोरेज प्लांटची (Cold Storage Plant) उभारणी, ई-मोबिलीटी (E-Mobility) तसेच इतर प्रकल्पांवरही संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे. महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  बिपीन श्रीमाळी यांच्या नेतृत्वाखाली महाप्रितने विविध सरकारी कंपन्या, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन तसेच आंतरराष्ट्रीय पातळींवर अनेक सामंजस्य करार केले आहेत.

याप्रसंगी महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटील, कार्यकारी संचालक (संचलन)  सुनील पोटे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक तथा मुख्य जनसंपर्क अधिकारी  एल. के. वर्मा व अन्य मान्यवर उपस्थित होते.