महाअपडेट टीम, 3 फेब्रुवारी 2022 : शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांनी सध्या तालुक्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. सध्या गावा – गावात विकासकामांचे उदघाटन, भूमिपूजन सुरु असून आता आ.अशोकबापू पवार हे शिरुर नगरपालिच्या क्रीडा संकुल व शॉपिंग कॉम्लेक्स करिता थेट मंत्रालयात पोहचले आहे.
शिरुर नगरपालिका हद्दीत आरक्षण क्रमांक – 6 मध्ये क्रीडा संकुल व शॉपिंग कॉम्लेक्स करिता जागा उपलब्ध असून त्या कामी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी कार्यसम्राट आमदार श्री.अँड अशोक बापू पवार यांनी क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना.श्री.सुनिल केदार साहेब यांना निवेदनाद्वारे केली.
या मागणीला श्री.सुनील केदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार अशोकबापू पवार यांना दिले आहे. विकासकामांसाठी आ. अशोक बापू यांचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
शिरूर शहरात क्रीडा संकुलन व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यामुळे शिरूर शिरूर शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.क्रीडा संकुल मुळे शिरूर शहरातील नागरिकांना मुलांना क्रीडा क्षेत्रात विकास होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शिरूर शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यामुळे अनेकांना रोजगार व नागरिकांना सुविधा मिळणार आहे
आत्तापर्यंत शिरूर शहराच्या विकासाठी आ. अशोक बापू पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. सध्या शिरूर शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे व पथदिव्यांचे कामे सुरु आहे. आ. अशोक बापू पवार यांनी शिरूर शहरातील हाती घेतलेलं काम कायमस्वरूपी मार्गी लावताना दिसून येत आहे.