मऊ गादी किंवा बेडवर झोपण्यापेक्षा खाली जमिनीवर झोपणे खूप फायद्याचे ठरते. जमिनीवर झोपणे शरीरासाठी आरामदायी ठरते. पाठीचा आजार असणाऱ्यांसाठी जमिनीवर झोपणे खूप फायद्याचे असते. याने पाठीला चांगला आराम मिळतो.

जमिनीवर झोपणं हाडांसाठी तर फायद्याचे ठरतेच त्यासोबत शरीरातील थकवा व ताण कमी करण्यासाठी जास्त फायद्याचे ठरते. चला तर मग जाणून घेऊयात जमिनीवर झोपण्याचे आरोग्यदायी फायदे.

पाठदुखी

पाठदुखी मुळे, काही लोक पातळ गादी बनवतात, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तज्ञांच्या मते, ८ तासांची झोप पूर्ण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या आरामाची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच लोक स्वतःचे बेड स्वतः सेट करतात.

असे म्हणतात की जमिनीवर झोपल्याने कंबरदुखी, तणाव यांसारख्या समस्या दूर होतात. एक काळ असा होता, जेव्हा लोक आपापल्या घरात जमिनीवर झोपायचे आणि त्यामुळे ते निरोगी राहायचे.

पाठीचा कणा मजबूत करते

थकवा आणि कामाच्या ओझ्यामुळे आजकाल बहुतेकांना मणक्याचे दुखणे सुरू झाले आहे. त्यासाठी महागडी औषधे आणि व्यायामही करतात, पण आराम मिळत नाही. वास्तविक, गादीवर झोपल्याने पाठीचा कणा ताठ होतो आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर महागड्या गादीवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपायला सुरुवात करा. असे केल्याने पाठीचा कणा मजबूत होतो.

रक्ताभिसरण

हेल्दी असण्यामागचे कारण योग्य रक्ताभिसरण नसणे हे देखील असू शकते. शरीरातील रक्ताभिसरण बरोबर असेल तर स्नायूंना आराम मिळतो, असे म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. म्हणूनच तुम्ही रोज जमिनीवर झोपायला सुरुवात करा. सुरुवातीचे काही दिवस त्रास होईल, पण सवय झाल्यावर बरे वाटेल.

ताण

काही लोक महागड्या गादीवर पडूनही तासंतास झोपू शकत नाहीत आणि यामागचे कारण तणाव असू शकते. तणावाचा मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. मन शांत करण्यासाठी जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. जमिनीवर झोपल्याने मिळणारी शांती मनातील तणाव दूर करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *