आपल्याला दररोज काम करून कंटाळा आला असेल, तर हा कंटाळा दूर करण्यासाठी आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. आपल्या देशात पर्यटनासाठी विविध ठिकाण आहेत.

परंतु यापैकी आपल्याला सगळीच ठिकाण माहिती असतात असे नाही, यामुळे जर तुम्ही फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला अशा ठिकाणांविषयी सांगणार आहोत, ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला फॅमिली सोबत पर्यटनाचा आनंद घेता येईल.

आग्रा : भारतातील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून आग्र्याला मानले जाते. ताजमहाल व्यतिरिक्त आग्रा किल्ल्यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू येथे आहेत, अशा ठिकाणी लहान मुलांनाही भेट द्यायला आवडते.

दार्जिलिंग: जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासह निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही सुंदर मैदानी प्रदेशात वसलेल्या दार्जिलिंगला जावे. नैसर्गिक नंदनवन समजल्या जाणाऱ्या या ठिकाणी तुम्ही खूप आनंद घेऊ शकता.

श्रीनगर: जर तुम्ही तलावांचे शहर असलेल्या श्रीनगरला भेट देणार असाल तर किमान ७ दिवस बाहेर काढल्यानंतरच येथे जा. कारण, इथे फिरण्यासारखी खूप ठिकाण आहेत.

नैनिताल : तलावांचे शहर मानल्या जाणाऱ्या नैनितालमध्ये अशी अनेक सुंदर दृश्ये आहेत, जी मनाला मोहून टाकतात. इथल्या डोंगरदऱ्यांमध्ये कुटुंबासोबत सेल्फी काढण्यात एक वेगळीच मजा आहे. यासोबतच मुलांसाठीही अनेक मनोरंजक उपक्रम आहेत.

अंदमान: अंदमान निकोबार हे कौटुंबिक सहलीसाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जात आहे. समुद्राच्या खोलीत वसलेल्या या बेटावर मोठया प्रमाणावर कौटुंबिक आनंद घेऊ शकता.

Leave a comment

Your email address will not be published.