poonam pandy
Lock Upp: Poonam Pandey crosses all boundaries, bathes in front of camera

मुंबई : OTT रिअॅलिटी शो लॉक अप शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत या शोचा पहिला सीझन जिंकण्यासाठी सर्व स्पर्धकांमध्ये स्पर्धा होत आहे. कंगना रणौतच्या या शोमध्ये अनेक स्पर्धक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडेने लॉकअपमध्ये असे काम केले, की ऐकून प्रेक्षकही थक्क होऊ शकतात.

लॉक अपच्या ताज्या एपिसोडमध्ये शिवम शर्मा यार्ड परिसरात सर्वांसमोर आंघोळ करू लागला. यावेळी तो शर्टलेस होता पण त्याने पायजमा घातला होता. पूनम पांडे, सायेशा शिंदे आणि पायल रोहतगी त्याला आंघोळ करताना पाहत होत्या. शिवमने पायजमा देखील काढावा असे या तिघी जोरात ओरडत होत्या.

एका प्रसिद्ध वृत्तानुसार, शिवमला हे करताना पाहून पूनम पांडेनेही सर्वांसमोर यार्ड परिसरात आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. ती साईशा शिंदे आणि पायल रोहतगीला सांगते. सोबतच ती असंही म्हणते की मी हे फक्त प्रेक्षकांसाठी करत आहे. सायेशा आणि प्रिन्स येऊन सर्वांना सांगतात की पूनम पांडेने यार्ड परिसरात आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. यावर प्रिन्स म्हणतो, ‘म्हणूनच मी बाहेर जात नाही.’ पुढे मुनव्वर म्हणतो, “मीही जात नाही कारण मी रमजान करत आहे.”

सायशा त्यांना चिडवते आणि हसायला लागते. नंतर प्रिन्स नरुला, मुनव्वर, अंजली आणि सायशा, पूनम आणि तिच्या वागण्याबद्दल गप्पा मारताना दिसतात. पूनम आंघोळ करत असताना पायल रोहतगी सोडून बाकी सगळे लॉकअप परिसरात बसले होते. तथापि, शोच्या निर्मात्यांनी पूनमचे ​​लॉक अपमध्ये आंघोळ करतानाचे फुटेज प्रसारित केलेले नाही.

कंगना राणौतच्या लॉकअपमध्ये पूनम पांडे तिच्या बोल्डनेससोबतच तिच्या खेळ आणि रणनीतीमुळेही चर्चेत आहे.

Leave a comment

Your email address will not be published.