नवी दिल्ली : साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘Liger’ थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहते विजयच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत होते. लिगरमध्ये विजयसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉलिवूड स्टार्सना मागे टाकले आहे.

लिगरचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. पहिल्याच दिवशी विजयने आमिर खान आणि अक्षय कुमारला मागे टाकले आहे. एका आठवड्यात अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडण्यात लीगर यशस्वी ठरू शकतो.

बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार, चित्रपट पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 27 ते 29 कोटींचा व्यवसाय करेल. तेलगूमध्ये या चित्रपटाचे कलेक्शन सुमारे 24.5 कोटी असण्याची शक्यता आहे. लिगरने हिंदी पट्ट्यात विशेष काही जमवलेले नाही. याने हिंदीत केवळ 2.50 कोटींची कमाई केली आहे. तरीही हा आकडा आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’च्या १५व्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे.

‘लिगर’च्या अॅडव्हान्स बुकिंगमुळे लोक विजय देवरकोंडाचा पंच पाहण्यासाठी उत्सुक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अनन्या पांडेला मात्र विशेष प्रतिसाद मिळत नाहीये. चित्रपटातील गाणी आणि रम्याचा जबरदस्त अभिनय यामुळे चित्रपट अधिकच रंजक झाला.

पुरी जगन्नाधच्या या अॅक्शन ड्रामा चित्रपटाची सुरुवात अशी आहे की त्याने आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या अलीकडच्या रिलीजलाही मागे टाकले आहे. लिगरला संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी. काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला तर काहींनी निराशाजनक म्हटले. असे असूनही या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे.