मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून पदार्पण करणारे पाठक बाई आणि राणा दादा हे आता खऱ्या आयुष्यातही एक-दुसऱ्यांचे झाले आहेत. होय तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते, आता हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकत्र आले आहेत.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून या दोघांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेने सर्वांनाच वेड लावले होते, खरे तर ही मालिका पाठक बाई आणि राणा दादा या दोघांच्या जोडीमुळे खूप प्रसिद्ध झाली होती, मालिकेत नवरा-बायको म्हणून काम केलेल्या या जोडीने आता आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कलाविश्वात लग्नसराई सरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.
पाठकबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या अक्षयाने आणि आणि राणादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हार्दिकने त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणांचे काही फोटो सोशल मीडियाच्या शेअर केले आहेत, आणि आपल्या साखरपुड्याची अधिकृत माहिती दिली आहे.
या दोघांच्या साखरपुड्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच या जोडीच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी कलाकारही त्यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.