महाअपडेट टीम, 2 फेब्रुवारी 2022 : मुंबईतील क्रूझ शिप ड्रग्ज पार्टी प्रकरण उघडकीस आणणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना पुनः एकदा मोठा धक्का बसला आहे. आधीच समोर वानखेडेंची नार्कोटिक्स कंट्रोलमधून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या नावावर असलेल्या बारने ही चर्चेला उधाण आलं होतं.

परंतु आता त्यांच्या नावावर असलेले मुंबईतील बारचे लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री. राजेश ज. नार्वेकर यांनी मुंबईतील सद्गुरु हॉटेल अँण्ड बारचे लायसन्स रद्द केले असून त्यांना दुपारपर्यंत लेखी प्रत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे समीर वानखेडेंना मोठा धक्का बसला आहे.

बारचं नेमकं काय होतं प्रकरण :-

समीर वानखेडे यांनी 1997 मध्ये बारसाठी परवाना काढला होता. परंतु त्यांच वय अवघे 17 वर्षे होते तर ते मिळवण्यासाठी किमान वय 21 असावे, अशी अट आहे. मात्र, याचे उल्लंघन करण्यात आलं असून त्यांनी चुकीची माहिती दिल्याचं आढळलं होतं. याबाबत त्यांना नोटीसही बजावली होती. अखेर आज त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते गंभीर आरोप…

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी वानखेडे आणि त्यांच्या वडिलांवर आणखी एक नवा आरोप केला होता.

वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. तो दावा अखेर खरा ठरला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *