लिंबू खाण्यासोबतच लिंबाची पानेही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. लिंबाच्या पानांमुळे चेहऱ्याशी निगडित समस्यांवर आराम मिळतो. लिंबाच्या पानांमुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत होते.

यांसारखे लिंबाच्या पानांचे खूप फायदे आपल्या चेहऱ्यासाठी होतात. चला तर मग जाणून घेऊ लिंबाच्या पानांचे आपल्या चेहऱ्यासाठी होणारे गुणकारी फायदे.

स्वच्छ त्वचा

जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला. तसेच एक चमचा पुदिन्याच्या पानांचा रस घाला. ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि कोरड्या कापसाने चेहरा स्वच्छ करा.

मऊ त्वचा

मऊ त्वचेसाठी लिंबाच्या पानांचे लोशन वापरून पहा. खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क मिसळा आणि चेहरा आणि हातावर लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम होऊ शकते.

पिंपल्स

लिंबाप्रमाणेच त्याची पाने देखील त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला लिंबाच्या पानांचा फेस पॅक बनवावा लागेल. एका भांड्यात दोन ते तीन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क आणि मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

तजेलदार त्वचा

ऊन आणि उष्णतेमुळे त्वचेचा रंग निघून जातो, अशा स्थितीत त्वचा उजळण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता. एक चमचा लिंबाच्या पानाच्या अर्कामध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा.

Leave a comment

Your email address will not be published.