गेल्या काही दिवसांपासून देशात दरदिवशी पेट्रोलचे दर वाढत आहे. यामुळे आता बाईक घेताना बाईकच्या मायलेजचा देखील विचार केला जाऊ लागला आहे. यातच किंमतीच्या मानाने स्वस्त आणि दुसरीकडे मायलेजसाठी जबरदस्त अशा काही बाईक्स विषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत

Hero HF Deluxe : या बाईकची सुरुवातीची किंमत 51,200 रुपये आहे. ही 4 व्हेरिएंट्स आणि 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 97.2 सीसी BS-VI इंजिन आहे आणि त्याचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.

Bajaj CT 100 : या बाईकची सुरुवातीची किंमत 53696 रुपये आहे. ही 1 व्हेरिएंट आणि 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 102 सीसी इंजिन आहे. हे 70 किमी पर्यंत मायलेज देते.

Bajaj Platina 100 : ही मायलेज असलेली बाईक आहे. त्याची सुरुवातीची किंमत 52,915 रुपये आहे. हे 4 प्रकार आणि 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 102 सीसी इंजिन आहे. हे 72 किमी पर्यंत मायलेज देते.

TVS Radeon : या बाईकची सुरुवातीची किंमत 59,925 रुपये आहे. ही 5 व्हेरिएंट्स आणि 12 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109.7 सीसी इंजिन आहे. हे 65 किमी पर्यंत मायलेज देते.

TVS Sport : या बाईकची सुरुवातीची किंमत 59130 रुपये आहे. ही 2 व्हेरिएंट्स आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109 सीसी इंजिन आहे. हे 70 किमी पर्यंत मायलेज देते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *