पाणी हे आपल्यासाठी जीवनच मानले जाते. कारण पाणी हा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा पोषक घटक मानला जातो. याने आपल्याला खूप ताकद मिळते. पण जर आपण वेळोवेळी पाणी पिले नाही तर आपल्याला शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. हे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे आपल्या शरीरात अनेक आजाराच्या समस्या वाढू शकतात.

यासाठी आपण भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुम्हाला शरीराचे कोणते आजार व समस्या वाढू शकतात याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मग जाणून घ्या पाण्याच्या कमतरतेमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या समस्या.

पचनसंस्था – कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनक्रिया नीट होत नाही आणि बद्धकोष्ठता, अपचन अशा विविध समस्या उद्भवू लागतात.

निद्रानाशाची समस्या – शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही निद्रानाश होऊ शकतो. चांगली आणि गाढ झोप न मिळाल्याने थकवा, चिडचिडेपणा आणि संबंधित समस्या उद्भवू लागतात.

UTI ची समस्या – हे सर्वज्ञात आहे की पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील घाण लघवीद्वारे बाहेर पडते, परंतु त्याच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका, गुप्तांगात जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.

मानसिक आरोग्य – कमी प्रमाणात पाणी सेवन केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. एवढेच नाही तर कमी पाणी प्यायल्याने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोकाही असतो.

किडनी समस्या – किडनी आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्याचे काम करते, परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील उद्भवते.

रक्तदाब – शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब नियंत्रणात राहत नाही, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

त्वचेच्या समस्या – पुरेसं पाणी प्या, असं अनेकदा म्हटलं जातं चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते मात्र पाण्याअभावी चेहऱ्यावर कोरडेपणा, निर्जीवपणा, सुरकुत्या अशा अनेक समस्या उद्भवतात.

वजन वाढणे – शरीरात पाण्याची कमतरता देखील लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्या.

Leave a comment

Your email address will not be published.