मुंबई : KRK या नावाने प्रसिद्ध असलेला कमाल आर खान अनेकदा ट्विटरवर बॉलिवूड सेलिब्रेटींना टार्गेट करताना दिसला आहे. कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’चे कौतुक केल्यानंतर केआरकेने अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे.

केआरके अनेकदा अक्षय कुमारला ट्रोल करताना दिसला आहे. यावेळी केआरकेने ‘सम्राट पृथ्वीराज’चा खराब प्रदर्शन पाहता अक्षय कुमारची खिल्ली उडवली आहे. ट्विटरवर, KRK ने कमल हसनचा ‘विक्रम’ सोमवारी देखील हाऊसफुल चालवल्याबद्दल प्रशंसा केली तर अक्षय कुमारवर ‘सम्राट पृथ्वीराज’च्या खराब कामगिरीबद्दल टीका केली.

आपल्या त्याने लिहिले, “‘विक्रम’ चित्रपट आजही तमिळमध्ये हाऊसफुल चालू आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. गुटखा किंग श्री श्री अक्की बाळा महाराज जी यांचे अभिनंदन.” केआरकेने यापूर्वी देखील अक्षय कुमारला ट्रोल केले आहे.

डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर तिच्या करिअरला सुरुवात करत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट निर्मात्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अक्षय कुमारचा हा बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्यात अपयशी ठरला, तर दुसरीकडे साऊथच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.