नवी दिल्ली : आशिया कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत सर्व गडी गमावून 147 धावा केल्या. याला उत्तर म्हणून भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर केएल राहुल खाते न उघडता शून्यावर परतला. यावर प्रेक्षक चांगलेच संतापले आणि त्यांनी सोशल मीडियावर प्रचंड राग काढायला सुरुवात केली. केएल राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीही लोकांच्या रोषाची बळी ठरली.

केएल राहुल शून्यावर बाद झाल्याने दुखावलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. लोक इतके संतापले की या जोडप्याच्या लग्नाबद्दलही ते थेट बोलू लागले. जरी काहींनी यावर मजेदार मीम्स शेअर केले. राहुलचा हा परफॉर्मन्स पाहून अण्णांनी अथियासोबतचं लग्न रद्द करावं असं कुणीतरी लिहिलंय. तर काहींनी मजेशीर मिम्स शेअर केले आहेत. तर काहींनी अथियाच्या फिल्मी करिअरची तुलना केएल राहुलच्या बॅटिंगशी केली.

नुकतीच बातमी आली होती की हे कपल या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार आहे. काहीदिवांपूर्वी अथियाचे वडिल सुनील शेट्टी यांनी या दोघांच्या लग्नावर प्रतिक्रया दिली होती, तारखा मिळाल्या नंतर लग्न करणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले होते.