मुंबई : लग्नाच्या मोसमात सर्वजण केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सुनील शेट्टीनेही अथिया आणि केएल राहुलच्या नात्याला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा सुनील शेट्टीला अथिया आणि केएलच्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते. आता अभिनेत्रीच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता या दोघांच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, लव्हबर्ड्स केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. इतकंच नाही तर लग्नाचं ठिकाण ठरवण्यात आलं आहे.

केएल राहुल आणि अथियाचे लग्न कोणत्याही हॉटेलमध्ये नसून खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या बंगल्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. बंगल्यावर लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथियाने त्यांच्या लग्नाचे कपडेही फायनल केले आहेत. मात्र, जानेवारीत ते कोणत्या तारखेला लग्न करणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे कळल्यानंतर आता प्रत्येकजण या खास दिवसाची वाट पाहत आहेत.

2021 मध्ये तडप चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान अथिया आणि केएल राहुलचे नाते अधिकृत झाले. अथियाने तिच्या भावाच्या डेब्यू चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये केएल राहुलसोबत एन्ट्री घेतली होती. यादरम्यान सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यानंतरच अथिया आणि केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याची पुष्टी झाली.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानंतर आता चाहते केएल राहुल-अथियाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.