मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या आगामी KGF Chapter-2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे चित्रपटातील एक नवीन गाणं नुकतच रिलीज करण्यात आलं आहे.

KGF: Chapter 2 च्या या नवीन गाण्याचे नाव ‘सुलतान’ आहे. हे गाणं MRT MUSIC च्या YouTube चॅनलवर शेअर करण्यात आले आहे. या गाण्याचा पूर्ण व्हिडीओ रिलीज झाला नसला तरी हे गाणे फक्त लिरिकल आहे. चित्रपटातील बहुतेक गाणी शब्बीर अहमद यांनी लिहिली आहेत. दरम्यान, हे गाणं रिलीज होताच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यातील दमदार अंदाज आणि काही तरी धमाकेदार होण्याची चाहूल प्रेक्षकांना अजून उत्सुक करत आहे.

‘KGF Chapter 2’ हा 2018मध्ये आलेल्या ‘KGF’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट गरुडाशी लढाई दाखवण्यात आली होती. आता नव्या चित्रपटात तो अधीराशी स्पर्धा करणार आहे, जी खूपच धोकादायक आहे. ही स्पर्धा येत्या 14 एप्रिल 2022 ला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच, हा चित्रपट कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.