मुंबई : रिलीज झाल्यापासून दररोज, KGF 2 बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी करत आहे आणि सर्वांना चकित करत आहे. अलीकडेच KGF 2 चित्रपटाने जगभरात 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

त्याचबरोबर यशच्या चित्रपटाने हिंदी भाषेतही भरपूर कमाई केली आहे. होय, या चित्रपटाने हिंदी मध्ये 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. KGF 2 च्या हिंदी आवृत्तीने तिसऱ्या आठवड्यात 49 कोटी 14 लाखांचा गल्ला जमवला आहे. या आकड्यामुळे चित्रपटाला 400 कोटींचा आकडा पार करण्यात मदत झाली.

प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट १४ एप्रिल रोजी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट देशभरात चांगली कमाई करत आहे, KGF 2 विदेशातही धमाल करत आहे. थिएटरमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा KGF 2 आता लवकरच OTT (KGF 2 ON OTT) वर पाहायला मिळणार आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने भरघोस कमाई करून सर्वांना चकित केले आहे.

चित्रपटाची कमाई अजूनही सुरूच असून यशचा चित्रपट आणखी आठवडाभर बॉक्स ऑफिसवर राज्य करेल असे मानले जात आहे. त्यामुळे लवकरच यशचा चित्रपट OTT वरही व्ह्यूजच्या बाबतीत वेगळा विक्रम प्रस्थापित करेल अशी बातमी आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाने आपल्या नावावर एक विक्रम केला आहे. हा विक्रम ओटीटी हक्क विकून केला आहे.

बातमीनुसार, चित्रपटाचे हक्क एका OTT प्लॅटफॉर्मला 320 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या महिन्याच्या २७ तारखेपासून चित्रपटाचे स्ट्रीमिंग सुरू होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Leave a comment

Your email address will not be published.