Karisma Kapoor answers on second marriage; Said ...

मुंबई : करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. तरी देखील ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. करिश्मा दोन किशोरवयीन मुलांची आई आहे. पण तिचे सौंदर्य आणि फिटनेसमुळे वय कळत नाही.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या करिश्माला प्रेमाने लोलो म्हटले जाते. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये मला काहीही विचारा सत्र सुरु केले होते, यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले, ज्याचे उत्तर करिश्माने मजेशीरपणे दिले.

गुरुवारी, करिश्मा कपूरने आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान संवाद साधताना सांगितले की, आज ती चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या मूडमध्ये आहे. काही चाहत्यांनी आवडीचे पदार्थ विचारले तर कोणी रणबीर किंवा रणवीरला या पैकी कोण आवडते हे विचारले, यावेळी करिश्मा म्हणाली की, मला हे दोघेही आवडतात.

यादरम्यान, एका चाहत्याने करिश्मा कपूरला एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारला. चाहत्याने विचारले तू पुन्हा लग्न करशील का? यावर करिश्माने गोंधळलेला इमोजी डिपेन्ड्ससह एक GIF शेअर करून उत्तर दिले.

करिश्मा कपूर क्वचितच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल आणि घटस्फोटांबद्दल सार्वजनिकपणे बोलते. अलीकडेच करिश्मा कपूर तिचा चुलत भाऊ रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नात खूप मस्ती करताना दिसली. आलियाच्या कालिरा सेरेमनीमध्ये कालिरेचा एक तुकडा करिश्मावर पडला. यानंतर तिची प्रतिक्रिया पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत करिष्माने ‘Instagram vs Reality.. Kalira fall on me friends’ या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, यावेळी चाहत्यांनी, रणबीर-आलियानंतर आता करीष्माचा नंबर असल्याचे म्हंटले होते.

Leave a comment

Your email address will not be published.