नवी दिल्ली : अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेला अजून तीन रात्री तुरुंगात काढायच्या आहेत. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या केआरकेच्या जामीन अर्जावर आता सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. एका वादग्रस्त ट्विटमुळे केआरकेला दुबईहून परतताच मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. यानंतर त्याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.

अटकेनंतर न्यायालयाने केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान त्याने छातीत दुखू लागल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला रुग्णालयातून थेट आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले आहे. सध्या केआरके तुरुंगात असून जामिनाची वाट पाहत आहे. केआरकेच्या जामीन अर्जावरील सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी 5 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे.

केआरकेचे वकील अशोक सरावगी यांनी शुक्रवारी सांगितले की, “त्याच्या जामीन याचिकेवर २ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र शुक्रवारी कोर्टात सुट्टी असल्याने त्याची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे. अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल अपमानास्पद ट्विट केल्याबद्दल वांद्रे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्याला अटक केली आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर 24 ऑक्टोबर 2020 रोजी KRK विरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते. ऑक्टोबर 2020 मध्ये शिवसेनेचे युवा नेते राहुल कनाल यांच्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली होती. KRK विरुद्ध कलम 500 आणि 501 (बदनामी), 505 (सार्वजनिक गैरवर्तन), 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता) आणि IPC च्या 153A आणि IT कायद्याच्या कलम 67A (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कानाल म्हणाले, ‘कमाल खान सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी करतो आणि अपशब्द वापरतो. अशा प्रकारची वागणूक समाजात अस्वीकार्य आहे. त्यांना अटक करून मुंबई पोलिसांनी अशा लोकांविरुद्ध कडक संदेश दिला असून भविष्यात असे कोणी कोणाशीही करणार नाही.