मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, अभिनेता कमल हसन यांची प्रकृती ठीक नसून त्यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये (SRMC) दाखल करण्यात आल्याची बातमी साऊथ इंडस्ट्रीतून येत आहे. आता ताजे अपडेट येत आहे की अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कमल हसन यांच्या प्रकृतीबाबत एएनआयने ट्विट केले होते की, ‘तापाच्या तक्रारीनंतर कमल हसन यांना काल रात्री चेन्नईच्या श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. टीमच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याला दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.’

कमल हासन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ते सध्या त्यांच्या आगामी तामिळ चित्रपट मॅग्नम ओपसच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय इंडियन 2 बद्दलही ते चर्चेत आहेत. त्यांच्याशिवाय सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.