महाअपडेट टीम, 16 जानेवारी 2022 : आयुष्याच्या वळणावर ग्रामीण भागातही काही होतकरू तरुण आपल्या जिद्द आणि चिकाटीने सातत्याने केलेल्या प्रयत्नातून व यश मिळवतायेत फक्त आणि फक्त लक्ष केंद्रित आपल्या ध्येयाकडे, अशा काही शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये चिकाटी आणि जिद्द पआज रोजी दिसून आली जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील प्रवीण आजिनाथ खाडे यांनी ऑडिशन,शॉर्ट फिल्म, सतत अभ्यास कॉलेज जीवनातच चालू असताना त्याने चित्रपट सृष्टीकडे पाऊल वळवले.
आज रोजी चित्रपट सृष्टी मध्ये करिअर करायचं म्हटलं तर ती बाब खूप स्वप्न पाहणं पण महागाची झाली अशी ग्रामीण भागांमध्ये सामाजिक व्यथा आहे पण नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये अतिशय ग्रामीण भागातल्या होतकरू व्यक्तीने ज्यापद्धतीनं यश मिळवलं त्याने नवी उमेद मिळाली आणि तशीच आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवत विविध प्रकारचं लेखन करून प्रवीण खाडे यांनी तालुक्याची मान उंचावली, त्याने ताजमहल नावाची शॉर्ट फिल्म चे लेखन आणि दिग्दर्शन केले होते.
काल मुंबई येथे या शॉर्ट फिल्मला प्रबोधन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कलामहर्षी बाबुराव पेंटर अवार्ड 2022 देण्यात आला, मंत्री ना. श्री. सुभाष देसाई (मंत्री.उद्योग, खाणकाम, मराठी भाषा मंत्री ) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला, त्यावेळी श्वास,डोंबिवली फास्ट फेम अभिनेते श्री.संदीप कुलकर्णी, गोदावरी,पुणे 52 ,जून यासारख्या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक निखिल महाजन तसेच प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी, ज्येष्ठ समीक्षक श्री.अशोक राणे, सुप्रसिद्ध लेखक गणेश मतकरी, मनोज जोशी व विविध मान्यवरांच्या ,कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
प्रवीण खाडे याच्या जिद्द चिकाटी व शॉर्ट फिल्मच कौतुक करावं तेवढं कमीच आहे, प्रवीण आजिनाथ खाडे, चित्रपट सृष्टी मध्ये कसलीही घराची ना गावाची पार्श्वभूमी नसलेला शेतकऱ्याचा मुलगा पण सातत्याने प्रयत्न करत,लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करून आपल्या मेहनतीने त्याने ही यशस्वी वाटचाल घडवली त्याबद्दल ग्रामीण भागातील नव युवकांना प्रेरणा मिळत आहे व प्रवीण खाडे चे अभिनंदन होत आहे.
प्रविण अजिनाथ खाडे रा. आनंदवाडी ता. जामखेड जिल्हा अहमनगर येथे राहणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाने लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ताजमहाल या लघुपटाने (शॉर्ट फिल्म ) प्रबोधन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार जिंकले
कलामहर्षी बाबुराव पेंटर अवार्ड 2022
1) Best short film on social ,maharastra
आणि
2) Best Actor award