raveer singh

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सध्या रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ (Jayeshbhai Jordaar)  चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील एक सिनच्या वादामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते.

रणवीर सिंग स्टारर ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण आता या चित्रपटाबाबत मोठी बातमी येत आहे ज्यामुळे रणवीर सिंगच्या अडचणी वाढू शकतात.

वास्तविक, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जन्मपूर्व लिंग तपासणी दृश्यामुळे चित्रपट कायदेशीर अडचणीत अडकला आहे. चित्रपटाच्या या दृश्यावर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात चित्रपटातून हे दृश्य हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात रणवीर सिंग जयेशभाई पटेल नावाच्या गुजराती व्यक्तीची भूमिका साकारत आहे, ज्याचे लग्न शालिनी पांडेशी म्हणजेच मुद्रा पटेलशी झाले आहे.

लग्नानंतर जयेशभाई आपल्या न जन्मलेल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करतो, लिंग चाचणीदरम्यान मुद्राच्या पोटी मुलगी असल्याचे समजते, ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या या दृश्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, जन्मपूर्व लिंग चाचणी करणे हा ‘कायदेशीर गुन्हा’ आहे. अशा स्थितीत या कामाला चालना देणारा देखावा काढून टाकला पाहिजे. चित्रपटाच्या वादात अडकल्यानंतर त्याची रिलीज डेटही काही काळ पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published.