नवी दिल्ली : जया बच्चन अनेकदा सामाजिक विषयांवर आपले मत व्यक्त करतात. आता त्यांनी पाश्चिमात्य कपडे परिधान करणाऱ्या महिलांबाबत मत व्यक्त केले आहे. जया बच्चन नेहमीचीच बिनधास्तपाने आपले मत मांडण्यासाठी ओळखल्या जातात.

आता जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या सोबत पॉडकास्टमध्ये एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी भारतीय महिलांच्या फॅशन सेन्सवर भाष्य केले आहे. यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. लोक भारतीय कपड्यांऐवजी पाश्चिमात्य कपडे का पसंत करतात, हे मला समजत नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.

जया बच्चन म्हणाल्या, ‘मला महिलांनी स्त्रीशक्ती दाखवावी अशी माझी इच्छा आहे’ जया बच्चन म्हणतात, ‘आपण असे ठरवले आहे की विदेशी कपड्यांमुळे महिलांना पुरुषांसारखेच अधिकार मिळतात, पण महिलांनी त्यांची स्त्रीशक्ती दाखवावी असे मला वाटते. साडी नेसा असे मी म्हणत नाही, परदेशातही स्त्रिया ड्रेस घालतात, हा सगळा बदल तेव्हा झाला जेव्हा महिलांनी पॅंट घालायला सुरुवात केली. यावर जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन म्हणते की, पँट घातल्याने महिलांना फिरणे आणि काम करणे सोपे जाते. ती पुढे म्हणते, ‘आपण कुठेही सहज जाऊ शकतो. अनेक महिला घरी नसतात, बाहेर जातात. त्यांना साडीचा पल्लू फिक्स करत राहण्यापेक्षा पॅंट आणि टी-शर्ट घालणे खूप सोपे आहे.

नव्या नवेली नंदा हिने यावेळी अनेक महिला सीईओबद्दल सांगितले ज्यांना साडी नेसणे आवडते. यावर जया बच्चन म्हणाल्या की, “ते असे करतात कारण त्या सेल्फ मेड आहेत आणि त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. जया बच्चन यांनी एखाद्या विषयावर आपले मत मांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी असेच काहीसे वक्तव्य केले हं . जया बच्चन लवकरच रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीमध्ये दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पुढील वर्षी 23 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.