मुंबई : IPL 2023 सुरुहोण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या किरॉन पोलार्डने निवृत्तीचा धक्कादायक निर्णय घेतला, आता तो संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये पोलार्डसोबत खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्याच्या निवृत्तीनंतर एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.

तुम्हाला आमच्यासोबत मैदानावर नसल्याची सवई होईल, पण तरीही मी नेटमध्ये आपल्या धमाल मस्तीचा आनंद घेईल,’ अशी पोस्ट बुमराहने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पॉलीचे अतुलनीय कारकीर्दीबद्दल अभिनंदन आणि तुमच्या पुढील प्रावासासाठी शुभेच्छा….

पोलार्डने निवृत्तीबद्दल एक टीप लिहिली आणि म्हटले की गेल्या 13 हंगामातील आयपीएलच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी संघाचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान, सन्मान आणि धन्य वाटत आहे. या आश्चर्यकारक संघासाठी खेळणे ही नेहमीच एक महत्त्वाकांक्षा होती आणि एक खेळाडू म्हणून तुम्हाला मिळालेल्या आयपीएलची चर्चा मी चुकवत असलो तरी, मला हे जाणून आराम मिळतो की मला आजूबाजूच्या काही सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याचे भाग्य लाभले आहे.

किरॉन पोलार्डने आयपीएलमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली आणि या संघात असतानाच निवृत्ती घेतली. त्याच्या आधी लसिथ मलिंगानेही अशीच कामगिरी केली होती. या संघात असतानाच त्याने निवृत्ती घेतली. पोलार्डकडे आता कोचिंगची जबाबदारी आली आहे. तो खेळाडूंना फलंदाजीतील युक्त्या शिकवताना दिसणार आहे.

गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सने पोलार्डला 6 कोटी रुपये देऊन आपल्या संघात ठेवले होते. जरी पोलार्डची कामगिरी चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सही प्लेऑफपूर्वीच बाहेर पडली. बॅटिंग कोच म्हणून पोलार्ड कसा प्रभावी ठरतो हे पाहायचे आहे.