JARIN KHAN
Jarin Khan's mother admitted to ICU due to poor health; "This" request made through social media

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्रीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झरीन खाननेही चाहत्यांना तिच्या तिच्या आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. जरीन खान शेवटची ‘हम भी अकेले तुम भी अकेले’ या चित्रपटात दिसली होती. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आईच्य प्रकृतीची माहिती दिली आहे.

जरीन खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जरीन खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, “आईची तब्येत अचानक बिघडल्याने रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करावे लागले. ती आयसीयूमध्ये आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया माझी आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करा. जरीन खानची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर अभिनेत्रीचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

झरीन खानने 2010 मध्ये सलमान खानच्या वीर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सलमान खाननेच तिला पहिली संधी दिली होती. वीर हा चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरला असला तरी. यानंतर जरीन खान हाऊसफुल 2, हेट स्टोरी 3, वजा तुम हो आणि अक्सर 2 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.

जरीन खानचे बॉलिवूडमध्ये विशेष करिअर नाही. त्यामुळे तिने पंजाबी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2014 साली जट्ट जेम्स बाँड या चित्रपटाद्वारे तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर 2019 मध्ये झरीन खान ढाका चित्रपटात दिसली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान खानच्या या अभिनेत्रीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरला.

Leave a comment

Your email address will not be published.