मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या तिच्या कामापेक्षा सुकेश चंद्रशेखरसोबतच्या नात्यामुळे जास्त चर्चेत आहे. सुकेशसोबतच्या संबंधांमुळे श्रीलंकन ब्युटी EOW च्या चौकशीत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक दिवसांपासून सातत्याने तिची चौकशी सुरू आहे. अभिनेत्री सध्या अंतरिम जामिनावर सुटली असली तरी आ ११ नोव्हेंबर हा दिवस तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

11 नोव्हेंबर रोजी तिच्या जामिनावर निकाल लागणार होता, मात्र आता तो १५ तारखेला लागणार असल्याचे समोर आले आहे. आता 15 नोव्हेंबर रोजी, जॅकलिनचा कथित प्रियकर सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित या 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, दिल्लीचे पटियाला कोर्ट अभिनेत्रीला तुरुंगात टाकायचे की जामीनावर सोडायचे यावर निर्णय देणार आहेत.

गुरुवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीनंतर शुक्रवारी निकाल सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. अशा स्थितीत आता 15 तारखेला राखीव आदेश जाहीर होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत 15 तारखेला जॅकलिनचा जामीन अर्ज फेटाळला तर अभिनेत्रीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, पटियाला हाऊस कोर्टात अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्रीला दिलेल्या जामिनाला विरोध केला होता. कोर्टात युक्तिवाद करताना ते म्हणाले होते की, “मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या सर्व आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे, मग जॅकलिनला जामीन का द्यावा? यासोबत जॅकलिनच्या जामीन अर्जाला आपला विरोध व्यक्त करत अभिनेत्रीने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर या प्रकरणाच्या तपासातही सहकार्य केले नाही. अशा स्थितीत जॅकलिनला जामीन मिळू नये.”

जॅकलिनवर मनी लाँड्रिंग प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप आहे. यासोबतच या अभिनेत्रीवर सुकेश चंद्रशेखरकडून करोडोंच्या भेटवस्तू घेतल्याचा आणि सत्य माहीत असूनही त्याच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागेल. यावेळी अभिनेत्रीला या प्रकरणात अंतरिम जामीन मिळाला आहे.