जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी,कारण आता रेल्वेने तिकीट बुकिंगसाठीच्या नियमात बदल केला आहे. अनेक प्रवाशी हे ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकिंग करून रेल्वेचा प्रवास सुलभ करतात.

पण यासाठी IRCTC च्या निर्णयानुसार आता प्रवाशांना तिकीट बुक करण्यापूर्वी त्याची मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी द्वारे पडताळणी करावी लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या नियमात कशाप्रकारे बदल झाला आहे.

पडताळणीसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरावा लागणार

पडताळणीसाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरावा लागेल. याशिवाय तुम्ही आता तिकीट बुक करू शकणार नाही. भारतीय रेल्वेची उपकंपनी IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, आता प्रवाशांना पडताळणी केल्याशिवाय तिकीट ऑनलाईन बुक करता येणार नाही.

या प्रवाशांना व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे

हे लक्षात घेण्यासारखे आहे की IRCTC चा हा नवीन बदल फक्त त्या प्रवाशांना लागू होईल ज्यांनी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत एकही रेल्वे तिकीट बुक केले नाही. दुसरीकडे, जर तुम्ही नियमित तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला ही प्रक्रिया फॉलो करावी लागणार नाही.

अशा प्रकारे, मोबाईल नंबर आणि ई-मेलद्वारे पडताळणी

-पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही IRCTC च्या अॅप किंवा वेबसाइटला भेट द्या.
-त्यानंतर व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा.
-येथे तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी टाका.
-खालील माहितीची पडताळणी करा.
-तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी मिळेल, तो एंटर करा.
-तुम्ही OTP टाकताच तुमचा नंबर आणि ईमेल आयडी पडताळला जाईल.
-यानंतर तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट सहज बुक करू शकता.

Leave a comment

Your email address will not be published.