मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात जवळपास सर्व संघांनी 10 किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. 10 संघांमध्ये ट्रॉफी मिळविण्याची लढाई आता हळूहळू अधिक रोमांचक होत आहे. आता टॉप फोरचे चित्र थोडेसे स्पष्ट होताना दिसत आहे. गुजरात, लखनऊ आणि राजस्थानचे संघ अव्वल ४ मध्ये कायम आहेत.
कोलकात्याचा 75 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर लखनऊ संघाने प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. लखनऊच्या या शानदार विजयानंतर गुजरातचा संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. 11-11 सामन्यांत दोन्ही संघांचे 16-16 गुण आहेत परंतु निव्वळ धावगतीच्या आधारावर लखनऊ संघाने मागे टाकले आहे.
राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबला हरवून राजस्थानचे १४ गुण झाले आहेत. आरसीबीचा संघ चौथ्या क्रमांकावर असून त्याचे ११ सामन्यांत १२ गुण आहेत. दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे १० सामन्यांत ५ विजयांसह १० गुण आहेत.
दिल्लीच्या या विजयानंतर हैदराबादचा संघ खाली घसरला आहे. संघ आता सहाव्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात 10 गुण आहेत. सातव्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा संघ आहे. 10 सामन्यांतून 5 विजयांसह, संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे.
8व्या क्रमांकावर कोलकाता संघ आहे, ज्याला 11 सामन्यांत केवळ 4 विजय नोंदवता आले आहेत आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ चेन्नई आणि मुंबई 9 आणि 10 व्या क्रमांकावर आहेत. चेन्नईने तीन तर मुंबईने आतापर्यंत दोन विजय नोंदवले आहेत.