मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील प्लेऑफची शर्यत आणखीनच रंजक बनली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवून आपला प्लेऑफचा दावा मजबूत केला आहे.

आंद्रे रसेलने खेळलेल्या शानदार खेळीच्या जोरावर केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाला केवळ १२३ धावाच करता आल्या.

कोलकाता संघाने ‘करो या मरो’च्या सामन्यात शानदार खेळ दाखवत प्लेऑफमधील आपला दावा कायम राखला. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरलेला संघ जिंकला नसता तर स्पर्धेतून बाद होण्याचा धोका होता. श्

रेयस अय्यरच्या संघाने दमदार खेळ दाखवत सामना जिंकून हैदराबाद संघाच्या अडचणी वाढवल्या. आता कोलकाता 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो आणि आता संघ निव्वळ नेट रन रेटच्या आधारावर उर्वरित संघांशी लढा देऊ शकतो.

प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता

13 सामने खेळल्यानंतर कोलकाताचे आता 6 विजयांसह 12 गुण झाले आहेत. या सामन्यापूर्वी, संघाच्या खात्यात 10 गुण होते आणि पराभवाचा अर्थ स्पर्धेतून बाहेर पडणे होते.

आता कोलकाताला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 18 मे रोजी पुढील सामना खेळायचा आहे. येथील विजयासह संघाचे १४ गुण होतील आणि निव्वळ धावगतीच्या आधारावर प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळाल्यास ते आपला दावा मांडू शकतील.

कोलकाताविरुद्धच्या पराभवामुळे हैदराबादच्या संघाचा प्लेऑफमधील मार्ग कठीण झाला आहे. स्पर्धेत 2 पराभवानंतर सलग 5 विजय मिळवणाऱ्या या संघाला आता गेल्या पाच सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

12 सामन्यांनंतर संघाचे 5 विजयांसह 10 गुण आहेत. कोलकात्याविरुद्धच्या विजयानंतर संघाला १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी होती, पण आता पुढचे दोन सामने जिंकल्यास त्यांना केवळ १४ गुणांपर्यंतच मजल मारता येईल.

Leave a comment

Your email address will not be published.