rcb
IPL 222: Three-match win over Bangalore, Chennai by 13 runs

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 49व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (Royal Challengers Bangalore) एमसीएच्या मैदानावर झाला. चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या. 20 षटकांत चेन्नईचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावाच करू शकला. बंगळुरूने 13 धावांनी सामना जिंकून सलग तीन पराभवांची मालिका संपवली.

चेन्नईचा डाव

डेवोन कान्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलग दुसऱ्या सामन्यात दमदार सुरुवात केली. 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 51 धावा केल्या.

शाहबाज अहमदने ऋतुराजला 28 धावांवर बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले, ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला 1 धावांवर प्रभु देसाईच्या हाती झेलबाद केले. मॅक्सवेलने अंबाती रायडूला 10 धावांवर क्लीन बोल्ड केले.

चेन्नईच्या कान्वेने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने 33 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह पन्नास धावा पूर्ण केल्या. 56 धावांची इनिंग खेळल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कान्वेने बाऊंड्रीवर शाहबाजकडे त्याचा झेल दिला.

रवींद्र जडेजाने अवघ्या 3 धावा करून हर्षल पटेलच्या बॉलवर आपली विकेट गमावली. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला. पहिला मोईन अली 34 धावांवर हर्षलचा बळी ठरला, त्यानंतर 2 धावांवर खेळत असलेल्या जोस हेजलवूडने महेंद्रसिंग धोनीला बाऊंड्रीवर झेलबाद केले.

बंगळुरूचा डाव

कर्णधार डु प्लेसिस आणि विराट कोहलीने बंगळुरूच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये 57 धावा जोडल्या पण आरसीबीला पहिला धक्का डुप्लेसिसच्या रूपात 8व्या षटकात बसला तो मोईनच्या बॉलवर जडेजाच्या हाती झेलबाद झाला.

बंगळुरूला दुसरा धक्का धावबादच्या रूपाने बसला. मॅक्सवेल 3 धावांवर धावबाद झाला. मोईन अलीने कोहलीला बोल्ड करून तिसरी विकेट घेतली. त्याने 30 धावा केल्या.

संघाला चौथा धक्का पाटीदारच्या रूपाने बसला. वैयक्तिक 21 धावांवर तो प्रिटोरियसच्या हाती मुकेशकडे झेलबाद झाला. आरसीबीला १९व्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सलग दोन धक्के बसले.

प्रथम महिपाल 42 धावा करून बाद झाला, त्यानंतर हसरंगा दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. दोघांनाही महेश तिक्षाने बाद केले. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहबाज 1 धावावर बाद झाल्यावर आरसीबीला आणखी एक धक्का बसला. त्याला तक्षनाने बोल्ड केले.

Leave a comment

Your email address will not be published.