नवी दिल्ली : आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक स्टार क्रिकेटपटूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. आयपीएलमध्ये खेळून क्रिकेटपटूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव यावर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे, परंतु आता क्रिकेट चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2023 मध्ये स्टार खेळाडू खेळताना दिसणार नाही.

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्जने पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बिलिंग्सने या वर्षाच्या सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्स (KKR) साठी 8 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 169 धावा केल्या. 2016 मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळला आहे.

सॅम बिलिंग्स यांनी ट्विट केले की, “मी एक कठोर निर्णय घेतला आहे. मी पुढील आयपीएलमध्ये खेळणार नाही. मला इंग्लंडमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात केंटसाठी लांब फॉरमॅट क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. मी भविष्यात पुन्हा तुमच्यासाठी खेळण्याची आशा करतो.”

सॅम बिलिंग्सने आपल्या संघातील खेळाडूंना कायम ठेवण्याच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी आयपीएलमधून माघार घेण्याची घोषणा केली. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 30 सामने खेळून 503 धावा केल्या आहेत. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे.