नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांनी आगामी IPL 2023 मिनी लिलावापूर्वी BCCI कडे त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. आयपीएल 2023च्या 16व्या हंगामासाठी डिसेंबरमध्ये मिनी लिलाव होणार आहे.

मुंबई आणि सीएसकेने आपापल्या याद्या BCCI ला सादर केल्या आहेत. कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंच्या यादीतील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे पाच वेळा आयपीएल चॅम्पियन एमआयने किरॉन पोलार्डला सोडले आहे. तर सीएसकेने रवींद्र जडेजाला संघात कायम ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जने ख्रिस जॉर्डन, अॅडम मिल आणि मिचेल सँटनरला सोडले आहे.

मुंबई इंडियन्सचा विचार केला तर पोलार्ड व्यतिरिक्त फॅब अॅलन आणि टायमल मिल्स यांनाही सोडण्यात आले आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे, परंतु गेल्या मोसमात त्याला संघर्ष करावा लागला.

आगामी आयपीएल 2023 मिनी लिलाव डिसेंबरमध्ये कोची येथे होणार आहे, बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना 15 नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.