नवी दिल्ली : IPL 2023 च्या लिलावापूर्वी सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे CSK रवींद्र जडेजाला संघात कायम ठेवणार की सोडणार? पण CSKने जडेजाला संघात ठेवून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मागील हंगापासून जडेजा पुढच्यावर्षी सीएसकेकडून खेळताना दिसणार अशी चर्चा होती.

तथापि, रवींद्र जडेजा सीएसकेमध्येच राहणार असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून यापूर्वीही सांगण्यात आले होते आणि तसेच झाले. CSK संघाने IPL 2023 साठी अष्टपैलू रवींद्र जडेजाला कायम ठेवले आहे.

या बातमीनंतर केवळ सीएसकेच नाही तर रवींद्र जडेजाच्या चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणाच्या अफवा इतक्या जोरात होत्या की स्वतः जडेजाला पुढे येऊन सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आहे.

IPL 2023 च्या लिलावापूर्वी चेन्नईने जडेजाला कायम ठेवताच रवींद्र जडेजाने ट्विट करून यावर प्रतिक्रिया दिली. त्याने संघाचा कर्णधार एमएस धोनीसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की सर्वकाही ठीक आहे 💛 #RESTART

चेन्नईने या वर्षी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी

एम एस धौनी, डेवॉन कानवे, रुतुराज गायकवाड़, अंबाती रायडू, सेनापति, मोइन अली, दूबे, राजवर्धन हैंगरगेकर, प्रिटोरियस, सेंटनर, जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, तीक्षाना.

सोडलेले खेळाडू : ड्वेन ब्रावो, एडम मिल्ने, क्रिस जार्डन, एन जगदीसन, सी हरि निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, राबिन उथप्पा (रिटायर)

आयपीएल 2022 बद्दल बोलायचे झाल्यास, लीग सुरू होण्याच्या दोन दिवस आधी अचानक जडेजाला CSK चे कर्णधारपद देण्यात आले पण कर्णधार म्हणून जडेजाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. संघाच्या खराब कामगिरीनंतर जडेजाने मध्येच कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर एमएस धोनीने ही जबाबदारी स्वीकारली.

या संपूर्ण घडामोडीनंतर, CSK आणि जडेजा यांच्यात सर्व काही ठीक नाही अशी अटकळ पसरली होती. पण आता सीएसकेने पुन्हा एकदा जडेजावर विश्वास दाखवल्याने या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.