नवी दिल्ली : सर्व फ्रँचायझींनी आयपीएल 2023 साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अधिकृत घोषणेपूर्वी सोशल मीडियावर खेळाडूंबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या की काही मोठ्या खेळाडूंना त्यांच्या फ्रँचायझींकडून कायम ठेवले जात नाही. यामध्ये सर्वात मोठे नाव होते भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे.

अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की राजस्थान रॉयल्स अश्विनला रिलीज करणार आहे. यावर राजस्थान रॉयल्सने अश्विनचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आणि चुकीचे वृत्त देणाऱ्यांची खरडपट्टी काढली.

अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की राजस्थान रॉयल्स संघातून युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल आणि रविचंद्रन अश्विन यांना रिलीज करणार आहे. या अफवांनंतर, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अश्विनचा रक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “तुम्हाला खरोखर ते जाणवले का”. अशाप्रकारे हे सर्व वृत्त चुकीचे ठरले कारण रॉयल्सने पडिक्कल आणि अश्विन या दोन्ही खेळाडूंना कायम ठेवले.

नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अश्विनला चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मात्र, तो राजस्थान रॉयल्ससाठी केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही योगदान देतो. गेल्या वर्षी त्याने कधी 3 व्या क्रमांकावर, कधी 5 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी केली.

राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेले खेळाडू : संजू सॅमसन (w/c), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, आर. अश्विन , युझवेंद्र चहल आणि केसी करिअप्पा

राजस्थान रॉयल्सने सोडलेले खेळाडू : अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर डुसेन, शुभम गढवाल, तेजस बरोका